नव्या वर्षात नवी मालिका , 16 जानेवारीपासून ‘शुभाविवाह’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना मिळणार आहे.  स्टार प्रवाह वाहिनीवर 16 जानेवारीपासून ‘शुभविवाह’ ही मालिका सुरू होत आहे. दुपारी 2 वाजता ही मालिका पाहता येईल.

बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱया भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे ‘शुभविवाह’ ही मालिका. मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजित श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘शुभविवाह ही नाते संबंध जपणारी कथा आहे. आयुष्य आपल्यासमोर नेहमी एक आव्हान घेऊन उभं राहतं. ते आव्हान हसतमुखाने सामोरं जाणाऱया भूमी या मुलीची ही कथा आहे. विवाह बंधन हे शुभ असतं, एकमेकांच्या विश्वासाचं असतं. या मालिकेत हीच वचनं, हेच संबंध कसे टिकवून ठेवायचे हा प्रवास पाहायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, ते तसं पाहता आलं पाहिजे हे सांगणारी मालिका आहे शुभविवाह.’