नया है यह! नव्या वर्षात बदलल्या अनेक गोष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

50 हजारांचा धनादेश; दोन वेळा कन्फर्मेशन

फसवणूक टाळण्यासाठी 50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्यदेशाचे दोन वेळा कन्फर्मेशन करावे लागेल.

कार्डची मर्यादा वाढली

कॉण्टॅक्टलेस कार्डची मर्यादा आता दोन हजारांहून पाच हजार रुपये केली आहे.

आधी शून्य डायल करा

यापुढे लॅण्डलाइनवरून मोबाईलवर फोन लावताना आधी शून्य लावणे बंधनकारक असणार आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्या 255 कोटी नवे नंबर तयार करू शकतील.

यूपीआय नियमात बदल

अॅमेझॉन पे, गुगल पे आणि फोन पेसारख्या थर्ड पार्टी अॅप्सच्या यूपीआय पेमेंटवर 30 टक्के मर्यादा लागू झाली.

व्यावसायिकांना दिलासा

पाच कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करणाऱया छोटय़ा व्यावसायिकांना चारवेळा जीएसटी रिटर्न फाईल कराव्या लागतील. आधी त्यांना 12 रिटर्न दाखल करावे लागत होते.

म्युच्युअल फंडचे नवे नियम

सेबीने मल्टीकॅप म्युचुअल फंडसाठी केलेल्या नव्या नियमांनुसार, आता फंड्सचा 75 टक्के हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असणार आहे.

सर्वसामान्यांसाठी विमा पॉलिसी

सरल जीवन विमा योजना सर्वसामान्यांना आता उपलब्ध होणार आहे. 18 ते 65 वयोगटासाठी ही योजना असून किमान 5 लाख ते 25 लाखांच्या रकमेची हमी मिळते.

कार खरेदी महागली

ऑटोमोबाईल कंपन्यांनी बीएस 6च्या नियमावलीचे पालन करण्यासाठी आपल्या कारच्या विविध मॉडेलवर साधारण 5 टक्के किंमत वाढवली आहे.

बाटलीबंद पाण्याची चव बदलणार

आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार आहे. बाटलीबंद पाण्यात 20 मिलीग्रॅम पॅल्शियम आणि 10 मिलीग्रॅम मॅग्नेशियम देणे जरूरी असेल. दोन्ही खनिज शरीरासाठी चांगले आहेत, असे एफएसएसएआयने सांगितले आहे.