
केंद्र सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी 1 जानेवारी 2021 पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये 1 जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री 1 डिसेंबर 2017 च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाह एम व एन कॅटेगिरीतील वाहनांनादेखील लागू असणार आहे. केंद्रीय मोटार मोटार वाहन नियम 1989 नुसार 1 डिसेंबर 2017 नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केले गेले होते. वाहन उत्पादक किंवा डीलरद्वारे ‘फास्ट टॅग’चा पुरवठा केला जात होता.


























































