नवीन वर्षात ‘श्रीगणेशा’दररोज 9 हजार 600 भाविकांना प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्षात  1 जानेवारीपासून दरदिवसाला तब्बल  9 हजार 600 भाविकांना प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारच्या नियमानुसार श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने श्रींच्या दर्शनाची व्यवस्था केली असून 1 जानेवारीपासून दर तासाला ऑनलाइन आरक्षण केलेल्या सुमारे 800 भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

न्यासाच्या वतीने याआधी दर तासाला ऑनलाइन आरक्षण केलेल्या 250 भाविकांना दर्शन घेता येत होते. आरक्षण असलेल्या भाविकांना एस. के. बोले मार्गावरील सिद्धी प्रवेशद्वार आणि काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिद्धी प्रवेशद्वार येथून दर्शन दिले जाणार आहे. दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण आवश्यक असल्याचे न्यासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण असलेल्या पण त्या दिवशी दर्शनासाठी येणे शक्य नसलेल्या भाविकांनी त्यांचे ऑनलाइन आरक्षण रद्द करावे, असे मंदिर न्यासाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दर्शनाच्या वेळा

सकाळी 7 ते दुपारी 12

दुपारी 12.30 ते सायंकाळी 7

रात्री 8 ते 9