
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात आजपासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात होणार होती. रावळपिंडीमध्ये पहिला सामना रंगणार होता. मात्र सामना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव मैदानात उतरण्यास नकार दिला आणि संपूर्ण दौराच रद्द केला.
उभय संघांमध्ये तीन एक दिवसीय सामने आणि पाच टी-20 सामने खेळले जाणार होते. यासाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये दाखलही झाला होता. मात्र रावळपिंडीमध्ये या मालिकेचा शुभारंभ होण्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला असून आर्थिक नुकसानही सोसावे लागणार आहे.
The BLACKCAPS are abandoning their tour of Pakistan following a New Zealand government security alert.
Arrangements are now being made for the team’s departure.
More information | https://t.co/Lkgg6mAsfu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 17, 2021
पाकिस्तात क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याची माहिती दिली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज आम्हाला सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द करत असल्याचे सांगितले. पाकिस्तानी सरकारने आणि पीसीबीने सुरक्षेसाठी सज्ज होते. किवी संघासोबत आलेले अधिकारीही सुरक्षेबाबत संतुष्ट होते. मात्र अखेरचा मिनिटाला ही मालिका रद्द झाल्याने जगभरातील आणि पाकिस्तानमधील क्रीडाप्रेमी निराश होतील, असे आपल्या ट्वीटमध्ये पीसीबीने म्हटले.
We have assured the NZ cricket board of the same. The Prime Minister spoke personally to the Prime Minister of New Zealand and informed her that we have one of the best Intelligence systems in the world and that no security threat of any kind exists for the visiting team.
2/4— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 17, 2021
18 वर्षानंतर दौरा
दरम्यान, न्यूझीलंडचा संघ 12 सप्टेंबरला पाकिस्तानला पोहोचला होता. विशेष म्हणजे तब्बल 18 वर्षानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार झाला होता. यासाठी सुरक्षा व्यवस्थाही चांगली करण्यात आली होती, असे पीसीबीने म्हटले. मात्र आता हा दौरा एकही सामना न खेळता रद्द करण्यात आला आहे.




























































