
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
मार्क झुकेरबर्ग यांच्या साथीने फेसबुकची निर्मिती करणाऱया क्रिस ह्युजेस यांनी फेसबुकचे तुकडे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याचा अर्थ सांगताना ते म्हणतात, फेसबुकला वेगवेगळय़ा कंपन्यांमध्ये विभागणे गरजेचे बनले आहे.
म्हणजेच व्हॉटस्ऍपची वेगळी कंपनी बनवावी, इन्स्टाग्रामची वेगळी कंपनी बनवावी आणि मेसेंजरलाही वेगळय़ा कंपनीचे रूप द्यावे, असे ते म्हणाले. फेसबुकचे तुकडे व्हावे सांगून त्यांनी मार्क झुकेरबर्ग यांचा अपमान केलेला नाही, तर मार्क यांच्यावर जबाबदारीचे वाढलेले ओझे कमी व्हावे ही त्यांची अपेक्षा आहे.

























































