‘या’ राज्याने बदलला कायदा, बलात्काऱ्याला करणार नपुंसक

अनेक देशांमध्ये बलात्काराच्या आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. बलात्काऱ्यांच्या शिक्षेबाबत अनेकदा गदारोळ झाले आहेत. नुकतच एका राज्याने बलात्काऱ्यांबाबत कायद्यात बदल केले आहेत. या राज्याने बलात्काराच्या आरोपीला नपुंसक करण्याचा कायदा केला आहे.

नायजेरिया देशातील कदुना प्रांतात हा कायदा करण्यात आला आहे. कदुनाचे प्रांत गव्हनर नासिर अहमद रुफाई यांनी ही माहिती दिली आहे. तसेच 14 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला मृत्युदंड दिला जाणार असल्याचे सांगितले आहे.

नायजेरियात कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात बलात्काराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले. अनेक महिला व मुलींवर या काळात अत्याचार झाले. त्यामुळे काडून प्रांताने हा निर्णय घेतला आहे

आपली प्रतिक्रिया द्या