24 ते 27 ऑक्टोबरदरम्यान लोंबार्ड, अमेरिका येथे ए.डब्लू.पी.सी. वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेचे कोविडच्या नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील ओपन क्लासिक रॉ गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना ठाण्याच्या 21 वर्षीय निखिल हेमंत भगत या युवकाने 75 किलो वजनी गटात तीन सुवर्ण पदकांची कमाई करीत हॅटट्रिक साधली.
हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक मोहम्मद अझमत यांचे निखिल भगतला मार्गदर्शन लाभले तर एडब्लूपीसीच्या हिंदुस्थानी शाखेचे अध्यक्ष दलजित सिंग यांचे प्रोत्साहन लाभले. निखिल भगत याने फुल्ल पॉवर, बेंच प्रेस व डेड लिफ्टमध्ये संस्मरणीय कामगिरी केली. त्याने फुल्ल पॉवर – 175 किलो (सुवर्ण), बेंच प्रेस – 105 किलो (सुवर्ण), डेड लिफ्ट 192.5 किलो (सुवर्ण) अशा प्रकारे उल्लेखनीय यश मिळवले.




























































