चीनमध्ये पसरला कोरोना व्हायरस, नऊ जणांचा मृत्यू

930

चीनमध्ये कोरोना नावाचा व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच फक्त चीनमध्ये नव्हे तर आशिया खंडातील देशांमध्येहेही हा व्हायररस पसरला आहे. या प्रकरणी जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय आणिबाणी घोषित करण्याचा विचार करत आहे.

2002 साली सारज नावाच्या आजारामुळे हा व्हायरस पसरला होता. तेव्हा दक्षिण चीनमध्ये हा व्हायरस पसरून 24 देशांतील 800 लोकांचा म्रुत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून हा व्हायरस अमेरिकेतही पोहोचला आहे. चीनमध्ये या व्हायरसचे आतापर्यंत 258 रुग्ण आढळले आहेत.  तसेच या व्हायरसमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनसह अनेक देशातही हा व्हायरस पसरल्याचे वृत्त आहे.

हिंदुस्थान सरकारने कोरोना व्हायररस संदर्भात सूचना जारी केली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या सूचना चीनमध्ये जाणार्‍या पर्यटकांनाही देण्यात आल्या आहेत.

काय आहे कोरोना व्हायरस

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सी फूडशी संबंधित हा व्हायरस आहे. हा व्हायरस ऊंट, मांजर, वटवाघूळ तसेच इतर जनावरांच्या शरीरात प्रवेश करत आहे. कोरोना व्हायरसमुळे रुग्णाला सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसतात. नंतर ही लक्षणाचे रुपांतर  न्युमोनियामध्ये होऊन किडनीवर त्याचा दुष्परिणाम होतो. या व्हायरसवर अजून कुठलीही प्रतिलस मिळालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या