
महाराष्ट्रातील ड्राय डे कमी करावा असा प्रस्ताव राज्याच्या उत्पादन आणि शुल्क विभागाने ठेवला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळून लावला आहे.
देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक ड्राय डे आहेत, त्या खालोखाल पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 3 दिवस ड्राय डे ठेवला जातो. तर कर्नाटक राज्यात फक्त एक दिवस ड्राय दिवस ठेवला जातो. महाराष्ट्रातील अनेक दारू निर्मिती आणि विक्री संघटनानी राज्यातील 9 ड्राय डे पैकी 4 ड्राय डे कमी करावी अशी मागणी उत्पादन आणि शुल्क विभागाकडे केली होती. यात 30 जानेवारीचा हुतात्मा दिन, ड्रायडे सप्ताहाचा शेवटचा दिवस 8 ऑक्टोबर, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या ड्राय डेचा समावेस होता. हा प्रस्ताव सध्या फेटाळण्यात आला असून निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडला जाईल.
गेल्या काही वर्षात बार, परमिट हॉटेल्सच्या व्यवसायात मंदी आली होती. ही मंदी दूर करण्यासाठी चार ड्राय डे काढण्यात यावा अशी विनंती हॉटेल व्यावसायिकांनी केली होती. परंतु राज्य सरकारने ही विनंती सध्या फेटाळली आहे.





























































