दोन कुटुंबाच्या भांडणात नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा बळी

1465

हिंगोलीतील वसमत तालुक्यातील वापटी येथे दोन कुटुंबीयांच्या किरकोळ भांडणात झालेल्या हाणामारीत स्वराज शिंदे या नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे कुरुंदा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. 24 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या या हाणामारीचा गुन्हा अठरा तासानंतरही दाखल झाला नव्हता.

कुरुंदा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वापटी येथे दोन कुटूंबात 24 ऑगस्ट रोजी झालेल्या भांडणाची व हाणामारीची माहिती देत जवाब नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता सांगितले. दोन कुटूंबातील हाणामारीत स्वराज शिंदे या बालकाचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, जवाब नोंदविण्याचे काम पूर्ण झाल्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या