चक्रीवादळ नुकसाग्रस्तांना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोअर ग्रुपची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्ग चक्री वादळामध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासकिय किंवा अशासकिय संस्थांकडून मदत किंवा मदत मिळवण्याबाबतचा कायदेविषयक सल्ला मिळावा यासाठी कोअर ग्रुपची स्थापना करण्यात आली असून मदत मिळणेबाबत काही समस्या असल्यास या कोअर ग्रुपकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाचा सर्वाधिक फटका हा खाडीपट्टा परिसरला बसला आहे. तालुक्यातील काही शाळांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामध्ये ज्यांचे नुकसान झाले, त्या नुकसानग्रस्तांना शासकीय तसेच अशासकीय संस्थांकडून आर्थिक मदतीचे वाटप सुरू झाले आहे. परंतु ही मदत मिळवताना काही अडचणी येत असतील तर त्यांना मोफत कायदेविषयक सल्ला मिळावा यासाठी या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.

या ग्रुपच्या अध्यक्षपदी विधी सेवा समितीचे अध्यक्ष वर्ग 1 चे न्यायाधीश ए. एस. आवटे हे असणार आहेत. या ग्रुपमध्ये दिवाणी न्यायाधीश व्हि.डी.साळवे, कायदासाथी चाळके तसेच अन्य काही वकिलांचा समावेश आहे. निसर्ग चक्री वादळात झालेल्या नुकसानीची मदत मिळण्यास काही अडचणी येत असतील तर त्या नुकसानग्रस्तांनी या ग्रुपशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.