
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. 45 वर्षांचे नबीन हे भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले असून ते पक्षाचे 12 वे अध्यक्ष आहेत. बिहारमध्ये पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या नबीन यांनी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे. गेल्या महिन्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. महिनाभरातच त्यांना अध्यक्षपदी बढती मिळाली.

























































