प्रशांत किशोर यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नीतीश कुमारांनी फेटाळला

795

नागरिकता सुधारणा विधेयकाला संयुक्त जनता दलाने पाठिंबा दिल्याने पक्षाचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपली भूमिका पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याने किशोर यांनी शनिवारी पक्षाचे अध्यक्ष नीतीश कुमार यांना भेटून राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, नीतीश कुमार यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला असून पक्षासाठी काम करण्यास सांगितले आहे. बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नसल्याचे नीतीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना सांगितले. या भेटीनंतरही नागरिकता सुधारणा कायद्याबाबतच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. या मुद्द्यावरून संयुक्त जनता दलात दोन गट पडले आहेत.

प्रशांत किशोर यांनी या कायद्यावरून पक्षआविरोधी भूमिका घेतली असतानाच आगामी निवडणुकीत प्रशांत किशोर आपल्या पक्षासोबत काम करणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. प्रशातंकिशोर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षासाठी निवडणूक रणनीती बनवण्याचे काम करत आहेत. केजरीवाल यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या बैठकीत प्रशांत किशोर यांनी एनआरसीचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावर एनआरसी बिहारमध्ये लागू होणार नसल्याचे नीतीश कुमार यांनी किशोर यांना सांगितले. पक्षाने आतापर्यंत नागरीकता सुधारणा विधेयकाला विरोध केला होता. मात्र, लोकसभेत पक्षाच्या खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने पक्षात दोन गट पडले आहेत. आता नीतीश कुमार यांनी एनआरसीला विरोध करत बिहारमध्ये लागू होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारत त्यांना पक्षासाठी काम करण्यास नीतीश कुमार यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या