नितीश कुमार यांच्या पदाबाबत सस्पेन्स कायम; राजीनाम्याची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिल्याचे वृत्त मिळाले आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसल्याने नितीश कुमार यांच्या बिहार विधान परिषदेच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स कायम आहे.जेडीयू नेत्याने नितीश कुमार यांच्या राजीनाम्यासह अध्यक्षांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषद सदस्यपद रिक्त होणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. सुरुवातीला त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते. मात्र, जेडीयूने स्पष्ट केले की त्यांचा राजीनामा पक्षाकडे आहे. आता जेडीयू नेत्याने नितीश कुमार यांचा राजीनामा घेत विधानपरिषद अध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, राजीनाम्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स कायम आहे. नियमांनुसार, राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांना विधान परिषदेचा राजीनामा देणे आवश्यक असते. विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतरही नितीश कुमार सहा महिने मुख्यमंत्रीपदी राहू शकतात.