11 राज्यांमध्ये दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू नाही, अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ 2.15 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोनामुळे वर्षभरापासून टेन्शनमध्ये असलेल्या नागरिकांसाठी आज एक चांगली बातमी आहे. गेल्या चोवीस तासात देशातील 11 राज्यांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनाच्या ऑक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 2.15 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.

राजस्थान, असाम, गोवा, पाँडेचेरी, मणिपूर, अरूणाचल प्रदेश, लडाख, सिक्किम, अंदमान निकोबार, मिझोराम, दादरा आनि नगर हवेली या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये चोवीस तासात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच गेल्या पाच महिन्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण 8.93 टक्क्यांवरून 5.79 टक्क्यांपर्यंत खाली आहे. दरम्यान, देशात ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित झालेल्यांची संख्या 90 वर पोहचली आहे.

15 राज्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण कमी

संपूर्ण देशाचा विचार करता 15 राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे. सर्वात कमी बिहारचे प्रमाण असून ते केवळ 1.44 टक्के एवढे आहे. सध्या देशात 2 लाख 24 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 1 कोटी 56 लाख नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरत केरळमध्ये 5 हजार 324 तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये 2890 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.