‘आप’विरोधात एकही पुरावा मिळाला नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या अधिपत्याखालील सर्व तपास यंत्रणांना ‘आप’वर सोडण्यात आले आहे. सगळ्या तपासण्या केल्या, धाडी टाकल्या; मात्र एकही पुरावा मिळाला नाही. सगळे खोटे आरोप करण्यात येत आहेत, असा आरोप ‘आप’चे खासदार राघव चड्डा यांनी केला.

खासदार राघव चड्ढा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यानंतर ते बोलत होते. चढ्ढा म्हणाले, ‘‘भाजप विरोधी पक्षांवर सातत्याने हल्ले करीत आहे. इमानदार व्यक्तींना दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा आसुरी, दानवी शक्तींचे प्रयत्न अयशस्वी होवो, यासाठी बाबांना साकडे घातल्याचे ते म्हणाले.’’