मिस्टर प्राईम मिनिस्टर, नो मंदिर-नो व्होट: न्यायालयाच्या गेटवर पोस्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

लोकसभा निवडणुकीमध्ये राममंदिर बांधण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणावर भाष्य करणारे पोस्टर शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या गेटवर लावण्यात आले आहे. ‘मिस्टर प्राईम मिनिस्टर, नो मंदिर-नो व्होट’ अशा स्वरूपाचा आशय या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत हिंदुस्थानी जनतेने भाजपला बहुमताने निवडून दिले. त्यावेळी अयोध्येमध्ये राममंदिर बाधण्यात येईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, गेल्या चार वर्षांमध्ये आयोध्येत मंदिराच्या बांधकामाची साधी एक वीटदेखील रचली गेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या चार नंबर गेटच्या भिंतीवर पोस्टर चिटकविण्यात आली आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश देण्यात आला आहे. ‘प्रधानमंत्री, मंदिर नाही तर मत नाही. आधी कायदा करा आणि २०१९च्या आत आयोध्येत राममंदिर बांधा’ अशा आशयाचा संदेश या पोस्टरवर छापण्यात आलेला आहे.