
रविवारी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. सुट्टीचा दिवस आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
No Mega Block on 8.9.2019
There will be no Sunday Mega Block on mainline and harbour line suburban sections of Central Railway on 8.9.2019 due to Ganpati Festival @RidlrMUM @m_indicator @mumbairailusers @mumbai_locals @SlowLocal
— Central Railway (@Central_Railway) September 6, 2019
रविवारी आठवड्याची सुट्टी असल्याने हजारो भाविक मुंबईतील विविध भागातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. यासह मुंबईबाहेरील लोकांचीही गर्दी असणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर घेण्यात येणारा रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
विशेष लोकल चालविण्यात येणार
दरम्यान, या काळात मध्य रेल्वेकडून छत्रपती महाराज शिवाजी टर्मिनस ते ठाणे/ कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गांवर शनिवारी रात्री आणि 12 सप्टेंबर रोजी रात्री 20 विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे/ कल्याण या मार्गावर पहाटे 3.3ृ0 वाजता तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर पहाटे 2.45 वाजता शेवटच्या लोकल सोडण्यात येतील. तसेच पश्चिम रेल्वेवरही शनिवारी रात्री आणि 12 सप्टेंबरच्या रात्री चर्चगेट-विरार मार्गावर 4 विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून शेवटची विशेष लोकल पहाटे3.20 विरारसाठी तर विरारहून शेवटची विशेष लोकल पहाटे 3 वाजता सुटेल.
































































