
हिंदुस्थानचे रेल्वे संरक्षण दल (RPF) 2022 मध्ये परीक्षापद्धतीने भर्ती करत असल्याचा दावा काही वेबसाइट द्वारे करण्यात आला होता. सोशल मीडियावर देखील अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. अशा बातम्यांमुळे अनेकांनी खात्री करण्याचा प्रयत्न केला. अखेर नोकर भर्तीचे हे वृत्त खोटं असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
एएनआय या वृत्तसंस्थेने रेल्वे प्रशासनाच्या हवाल्याने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ‘RPF च्या भर्ती संदर्भातील वृत्त खोटे असून अशी कोणतीही भर्ती सूचना प्रकाशित केलेली नाही.’
Some websites have published a notice claiming that the Indian Railway Protection Force (RPF) is recruiting through the RPF Constable Recruitment 2022 Exam. No such recruitment notice has been published by the RPF: Indian Railways pic.twitter.com/ICDoAQ2QXu
— ANI (@ANI) January 10, 2022




























































