कोविड लस संशोधकांना वैद्यक क्षेत्रातील नोबेल

@Jaun News Usa

कोविड-19 विषाणूवरील प्रभावी लस विकसित करण्यासाठी पेशीकेंद्रकाशी संबंधित उपयुक्त संशोधन करणारी संशोधक द्वयी पॅटलिन करीक आणि ड्रय़ू विजमान यांना 2023 साठीचे वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती नेमकी कशी काम करते हे समजून घेताना त्यांच्या दिशादर्शक संशोधनाने महत्त्वाची कामगिरी बजावली. यामुळेच मानवी आरोग्याला अतिधोकादायक अशा सध्याच्या कालखंडात अभूतपूर्व वेगाने लस विकसित करता आली, असे हा पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले आहे.