राज्यातील शाळांमध्ये 4 मार्चला घंटानाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

29 जानेवारीपासून आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पाठिंबा दिला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 4 मार्चला शाळांमध्ये घंटानाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे, अघोषित शाळा अनुदानासह घोषित कराव्यात, प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, संपूर्ण सेवा सरंक्षण द्यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हे शिक्षक आंदोलन करीत आहेत. राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी सर्व संस्थाचालक, अनुदानित शिक्षक व विद्यार्थी हे सोशल डिस्टन्सचे पालन करीत त्यांच्या शाळेतच एकत्र येऊन घंटानाद करतील असे सांगितले.