विना अनुदानित सिंलिंडरच्या दरात 62 रुपयांनी घट

सामना ऑनलाईन । मुंबई

घरघुती वापराच्या विनाअनुदानित सिंलिंडरच्या दरात 62.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 100.50 रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर महिनाभरातच आता 62.50 रुपयांनी दर घटविण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरात विना अनुदानित सिलिंडरचे दर तब्बल 163 रुपयांनी कमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या