नोकर्‍या भरपूर पण उत्तर हिंदुस्थानींमध्ये कौशल्य नाही; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात नोकर्‍या कमी नाहीत परंतु उत्तर हिंदुस्थानींमध्ये कौशल्य नाही असे विधान केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी केले आहे. मोदी सरकारचे 100 दिवस झाल्याच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी गंगवार यांनी हे विधान केले आहे. या 100 दिवसांत सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

संतोष गंगवार म्हणाले की, “देशात नोकर्‍या कमी नाहीत. जेव्हा उत्तर हिंदुस्थानमध्ये जेव्हा नियुक्तीसाठी लोक शोधतात तेव्हा अनेक तरुणांमध्ये कौशल्य नाही असे अधिकारी सांगतात.” ज्या पदासाठी उमेदवार हवा तशी योग्यता असलेला उमेदवार मिळत नसल्याची खंत अधिकारी व्यक्त करतात अशी माहिती गंगवार यांनी दिली. 

गंगवार म्हणाले की, श्रमिक, छोटे व्यापारी, मजूर कायदा, तिहेरी तलाक, कलम 370 हटवण्यासारखे अनेक निर्णय या 100 दिवसांत झाले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये अनेक केंद्रीय कायदे लागू होत नव्हते. आता ते लागू होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.