
उत्तर कोरियाने 2017 साली केलेली अणुचाचणी जपानच्या हिरोशिमावर 1945 साली टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बहून 17 पटीने शक्तिशाली होती, असा दावा इस्रो या हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेने शुक्रवारी केला. इस्रोने उ. कोरियाच्या अणुचाचणीवर सखोल अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष जाहीर केला.
2003 साली उत्तर कोरिया हा देश एनपीटीमधून बाहेर पडला आणि त्याने अनेक अण्वस्त्र बनवली. पाचवेळा त्यांनी अंडरग्राऊंड अणुचाचणीही घेतली. याच काळात 3 सप्टेंबर 2017 साली त्यांनी केलेल्या एका अणुचाचणीचा अभ्यास इस्रोने केला आहे. या अभ्यास टीममध्ये के. एम. श्रीजीत यांच्यासह स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटरच्या जिओसायन्स विभागाचे रितेश अग्रवाल आणि ए.एस.राजावत यांचाही समावेश होता.


























































