इंटेलिजेन्स ब्युरोत 258 पदांसाठी अधिसूचना जारी

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंटेलिजेन्स ब्युरो (आयबी) ने इंटेलिजेन्स ऑफिसर आणि टेक्निकल पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 25 ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने गेट 2023, गेट 2024, गेट 2025 मधील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.