दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी पकडले आहे. यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेले सर्व जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दिनांक 18 मार्च ते 19 मार्चच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विवेकानंद चौकची रात्रगस्त सुरू असताना गस्तीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांना माहिती मिळाली की, एका अपार्टमेंटच्या बाजूच्या शेतामध्ये, रिंग रोड लगत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही सराईत गुन्हेगार एकत्र जमून लपून बसले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांनी तात्काळ सदरची माहिती वरिष्ठांना कळविली. विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदारांना तात्काळ बोलावून घेऊन त्यांचे पथके तयार करून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या ठिकाणाला चहूबाजूंनी वेढा घालण्यात आला.

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ईश्वर गजेंद्र कांबळे, वय 21 वर्ष, राहणार जयनगर, लातूर प्रफुल श्रीमंत गायकवाड, वय 27 वर्ष, राहणार सिद्धार्थ सोसायटी, लातूर. महादेव अशोक पाटोळे, वय 22 वर्ष, राहणार जय नगर, लातूर. राहुल महादेव कसबे, वय 22 वर्ष, राहणार जय नगर, लातूर. यांना पकडले. महबूब उर्फ गोपाळ करीम शेख, वय 28 वर्ष, राहणार जय नगर लातूर. हा यावेळी पळून गेला.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लोखंडी बतई, कोयता, चॉपर, लोखंडी कत्ती असे घातक साहित्य मिळून आले. पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 188/2023 कलम 399, 402, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर हे करीत आहेत.

सदर गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शरीराविषयक व मालाविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, उदय सावंत, पोलीस उपनिरीक्षक हाजी सय्यद, पोलीस अमलदार संजय कांबळे, मुनवरखा पठाण, दयानंद सारोळे, सुधीर साळुंखे, संजय बेरळीकर, विनोद चलवाड, नारायण शिंदे, रमेश नामदास, मिलिंद कांबळे तसेच चार्ली मोटार सायकल पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.