
प्रत्येकाला वाटते आपल्याकडे आयफोन (iPhone) असावा. परंतु याच्या किंमती पाहून अनेकांचा हिरमोड होतो. मात्र सध्या एक जबरदस्त ऑफर सुरू असून 33 हजारांचा आयफोन 10 हजारांहून कमी किंमतीमध्ये घेण्याची संधी तुमच्याकडे आहे. iPhone SE वर ही ऑफर सुरू आहे.
iPhone SE हा गेल्या वर्षी अर्थात 2020 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याची किंमत एन्ट्री लेव्हल अॅड्रॉईड फोनएवढी आहे. iPhone SE मध्ये चार वर्षांपर्यंत ओएस अपडेट दिले जाईल. ही सुविधा स्वस्तातील अॅड्रॉईड स्मार्टफोनमध्ये मिळणार नाही.
iPhone SE ची मूळ किंमत 32 हजार 999 रुपये आहे. 64 जीबी व्हेरिएंटची ही किंमत आहे. मात्र ऑफरमध्ये हा फोन सध्या 25 हजार 999 रुपयांना मिळत आहे. तुमच्याकडे आयसीआयसीआय बँक किंवा अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड असेल आणि त्याद्वारे तुम्ही पेमेंट करणार असाल तर तुम्हाला 1500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. तेव्हा हा फोन तुम्हाला 24 हजार 999 (25,999 – 1500) रुपयांना पडेल.
iPhone SE फोनसोबत तुम्ही जुना फोनही एक्सचेंज करू शकता. फ्लिपकार्टमध्ये तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत 15 हजारांचा अतिरिक्त फायदाही मिळवू शकता. यामुळे iPhone SE ची किंमत 9 हजार 499 रुपये (24,999 – 15,000) होईल. असा पद्धतीने तुम्ही iPhone SE हा फोन दहा हजारांहून कमी किंमतीत खरेदी करू शकता.
iPhone SE चे डिझाईन थोडे जुने आहे. मात्र तुम्हाला स्वस्तात आयफोन वापरण्याचा आनंद लुटायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली ऑफर आहे.





























































