जयपूरच्या राजकुमारीनंतर मेवाडच्या राजाचा ‘आम्ही श्रीरामाचे वंशज’ असल्याचा दावा

654

‘आम्ही श्रीरामाचे वंशज आहेत. श्रीरामाचे पुत्र कुश यांच्या वंशकुळातील आमचे कुटुंब आहे,’ असा दावा जयपूरच्या राजकुमारी आणि भाजपच्या महिला खासदार दिया कुमारी यांनी केला होता. आता उदयपूरचे मेवाड राजघराण्यातील अरविंद सिंह मेवाड यांनी स्वत: श्रीरामाचे वंशज असल्याचा दावा केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. अरविंद यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून हा दावा केला आहे.

अरविंद यांनी ट्विटरवर म्हटले की, आमचे कुटुंब श्रीरामाचे वंशज असल्याचे ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध होते. आम्ही रामजन्मभूमीवर कोणताही दावा करत नाही ,परंतु अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर बनावे अशी आमचीही इच्छा आहे.

याआधी श्रीरामजन्मभूमी खटल्यावेळी शुक्रवारी ‘रघुवंश’ अजूनही अयोध्येत राहतात का, याची माहिती घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने ‘राम लल्ला विराजमान’ या पक्षकाराला विचारले होते. आम्ही त्यांचा शोध घेऊ, असे पक्षकार म्हणाले होते. त्यावर कुमारी यांनी हा दावा केला आहे. आपला दावा खरा आहे, हे सांगताना कुमारी म्हणाल्या, ‘कोर्ट म्हणतेय श्रीरामाचे वंशज कुठे आहेत? श्रीरामाचे वंशज जगभर आहेत. आमचे कुटुंबही श्रीरामाचे वंशज आहे. आम्ही श्रीराम पुत्र कुश यांच्या वंशावळीतील आहोत. याबाबतची हस्तलिखिते, वंशावळी आणि त्याबाबतची कागदपत्रे आमच्याकडे आहेत.’ या खटल्याचा निकाल लवकर लागावा, असेही त्या म्हणाल्या.

descendants of Lord Rama

आपली प्रतिक्रिया द्या