गुजरातमध्ये सिंहगर्जना संख्या पोहोचली 891 वर

गुजरातमध्ये सिंहांची संख्या मागच्या पाच वर्षांत चांगलीच वाढली आहे. आशियाई सिंहाची संख्या 891 झाली आहे. मे महिन्यात गुजरातमध्ये सिंहगणना करण्यात आली. याआधी जून 2020 मध्ये सिंहगणना करण्यात आली होती तेव्हा गुजरातमध्ये 674 सिंह होते. मागील पाच वर्षांत सिंहांची संख्या 217 ने वाढली आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले.

आशियाई सिंहगणना 10 मे ते 13 मे अशा चार दिवसांच्या कालावधीत चालली. आशियाई सिंह गुजरातच्या गिर नॅशनल पार्कमध्ये सर्वाधिक आहेत. सिंहगणनेनुसार 196 नर सिंह, 330 मादी सिंह 140 मध्यमवयीन सिंह तर 225 छावे आहेत. गीरमध्ये जे सिंह आहेत त्यांची संख्या 384 इतकी आहे, तर इतर ठिकाणी 507 सिंह आढळून आले आहेत. ही 16 वी सिंहगणना होती. दर पाच वर्षांनी गुजरातमध्ये सिंहगणना केली जाते. गणनेसाठी हाय टेक कॅमेरे वापरण्यात आले. तसेच रेडिओ कॉलर्सचा वापर करून सिंहांची ओळख पटवली.