पृथ्वी शॉनंतर गिल मैदान गाजवणार; न्यूझीलंडविरुद्ध मिळणार संधी, विराटचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंडविरुद्ध पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 3-0 अशी आघाडी घेतली आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विराट कोहलीने युवा खेळाडू शुभमन गिलच्या फलंदाजीचे कौतुक केले. मी जेव्हा 19 वर्षाचा होतो तेव्हा शुभमन गिलच्या 10 टक्केही नव्हतो अशी प्रांजळ कबुली विराट कोहलीने दिली. विराटच्या या वक्तव्याने चौथ्या एक दिवसीय सामन्यात शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता दिसत आहे.

टीम इंडियाचा विजयरथ सुरुच, कांगारुंनंतर कीवींना चिरडले; 10 वर्षानंतर मालिका विजय

‘तरुण खेळाडूंमधील प्रतिभावन क्रिकेटपटू समोर येत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेल्या संधीचा पृथ्वी शॉ याने कसा फायदा उठवला हे आपण पाहिलचे आहे’, असे विराट म्हणाला. पृथ्वीने या सामन्यात एक शतक व अर्धशतक ठोकले होते. तसेच शुभमनची फलंदाजीही खास असल्याचे विराटने म्हटले. मी त्याला नेट्समध्ये फलंदाजी करताना पाहिले आणि चकित झालो. कारण मी जेव्हा 9 वर्षाचा होतो तेव्हा शुभमन गिलच्या 10 टक्केही नव्हतो. त्याच्यातील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता आणि आणखी सुधारणा झाल्यावर हिंदुस्थानी क्रिकेटसाठी हे एक शानदार पर्व असेल, असेही विराट यावेळी म्हणाला.

#NZvsIND… तो आला, खेळला आणि जिंकला

पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल या तरुण खेळाडूंनी हिंदुस्थानला अंडर-19 विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या वर्षी झालेल्या या विश्वचषकात शुभमन गिलने 418 धावा चोपल्या होत्या आणि यासाठी त्याला मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता.

आयसीसीकडून अंबाती रायडूचे निलंबन

दरम्यान, सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या शुभमनला विराटच्या अनुपस्थितीत खेळण्याची संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. विराटला अखेरच्या दोन एक दिवसीय आणि टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.