
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात जाऊन पराभूत करणाऱ्या टीम इंडियाने न्यूझीलंडमध्येही विजयाची पताका फडकावली आहे. सोमवारी झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात विराट सेनेने यजमान कीवींचा 7 विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने तब्बल 10 वर्षांनी न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकली आहे.
Finishing touches courtesy @DineshKarthik & @RayuduAmbati after half centuries from @ImRo45 & @imVkohli takes #TeamIndia to a 7-wicket win in the 3rd ODI. 3-0 #NZvIND pic.twitter.com/XGTwOHmetM
— BCCI (@BCCI) January 28, 2019
न्यूझीलंडने दिलेल्या 244 धावांच्या आव्हानाचा टीम इंडियाने यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने सलग तिसऱ्या सामन्यात कीवींच्या वेगवान गोलंदाजीचा यशस्वी सामना केला. 6 चौकारांसह वेगाने धावा खेचणारा धवन 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी जमली आणि दोघात 100 पेक्षा जास्त धावांची भागिदारी झाली. या दरम्यान दोघांनीही आपले वैयक्तीक अर्धशतक पूर्ण केले.
#NZvsIND अखेरच्या दोन वन डे व टी-20 मालिकेतून विराट बाहेर
टीम इंडियाच्या दीडशे धावा पूर्ण झाल्या असताना रोहित 77 चेंडूत 62 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कोहलीही जास्त वेळ मैदानावर टीकू शकला नाही. 76 चेंजूत 60 धावा काढून कोहली बाद झाला. सलग दोन धक्के बसल्याने टीम इंडियापुढील अडचणी वाढल्या होत्या, परंतु चेंडू आणि धावांचे अंतर मोठे असल्याने रायडू आणि कार्तिकने संयमी तर खराब चेंडूवर आक्रमक खेळ करत संघाला 43 व्या षटकात विजय मिळवून दिला. रायडू 40 धावांवर तर कार्तिक 38 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून बोल्टने 2 तर सँटनरने एक बळी घेतला.
पंड्या वाघासारखा झेपावला, अप्रतिम कॅच घेऊन क्रिकेटप्रेमींची जिंकली मनं
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय चांगलाच अंगलट आला. शमी आणि भुवनेश्वर या वेगवान दुकडीपुढे न्यूझीलंडचे सलामीवीर गांगरताना दिसले. मुन्रो 7 आणि गप्टील 13 धावांवर बाद झाल्याने यजमानांची अवस्था सहाव्या षटकात 2 बाद 26 अशी होती. कर्णधार विलियम्सनही 28 धावांवर बादा. सुरुवातीच्या धक्क्यातून कीवींचा डाव अनुभवी फलंदाज रॉस टेलर आणि टॉक लेथम यांनी सावरला. टेलरने संपूर्ण अनुभव पणाला लावून न्यूझीलंडचा डाव 150 पार पोहोचवला. या दरम्यान, टेलरने अर्धशतकही ठोकले. परंतु शतकाकडे वाटचाल सुरू असताना शमीच्या गोलंदाजीवर टेलर 93 धावांवर बाद झाला. टेलर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला. लेथमने 51 धावांची खेळी केली. तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने मोठी धावसंख्या रचण्याचे कीवींचे स्वप्न भंगले आणि डाव 243 धावांत आटोपला.
‘या’ दोघांमुळे स्पर्धा वाढली, जागा टिकवण्यासाठी मारामारी; धवन अखेर बोलला
शमीची धारधार गोलंदाजी, भुवी-चहलची उत्तम साथ
वेगवान गोलंदाजी मोहम्मद शमीने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करत तीन बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमारने आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. पहिल्या दोन्ही सामन्यात बळींचा चौकार लगावणाऱ्या कुलदीपची पाटी या सामन्यात मात्र कोरी राहिली.
पांड्याचे यशस्वी कमबॅक
निलंबनाच्या कारवाईनंतर प्रथमच संघात स्थान मिळालेल्या पांड्याने संधीचा पुरेपुर फायदा उठवला. पांड्याने न्यूझीलंडची मधली फळी कापून काढत दोन बळी घेतले. या सामन्यात त्याचे गोलंदाजी विश्लेषण होते 10 षटक, 45 धावा आणि 2 बळी

























































