
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
न्यूझीलंडविरुद्घ सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसह टी-20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी पहिला सामना संपल्यानंतर ही माहिती दिली. विराटच्या जागी अखेरच्या दोन एक दिवसीय सामन्यांमध्ये व टी-20 मालिकेमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करण्याची शक्यता आहे.
Indian Captain Virat Kohli to be rested for the last two ODIs of the current #NZvIND series and all three T20Is, Vice-captain Rohit Sharma will lead the side in the final two ODIs and the T20 series. (file pic) pic.twitter.com/LR3QTxneo1
— ANI (@ANI) January 23, 2019
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 असे तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करण्यापूर्वी विराटला विश्रांती देण्यात यावी असे संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने सुचवल्याचे बीसीसाआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
2018 पासून विराट सातत्याने खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. श्रीलंकेत झालेला निदास चषक, अफगाणिस्तानविरुद्ध झालेली एकमेव कसोटी, व आशिया कव तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली होती.
विराट कोहलीने 2018 पासून आतापर्यंत 14 ते 15 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 1345 धावा चोपल्या आहेत. याच दरम्यान त्याने 18 एक दिवसीय सामन्यात 1400 पेक्षा जास्त धावा ठोकल्या. याच दमदार कामगिरीमुळे त्याला आयसीसीच्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.






























































