
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या हिंदुस्थानी संघाने विजयाने श्रीगणेशा केला आहे. नेपियार येथे झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात टीम इंडियाने यजमान न्यूझीलंडचा डकवर्थ ल्यूईसच्या नियामानुसार 8 विकेट्सने दणदणीत पराभव करत पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. धारधार गोलंदाजीने यजमानांचा डाव स्वस्ता गुंडाळणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
Clinical. #TeamIndia start off the series with a 8-wicket win against New Zealand in the 1st ODI. 1-0 #NZvIND pic.twitter.com/P4lLKjoCvu
— BCCI (@BCCI) January 23, 2019
न्यूझीलंडने दिलेल्या 158 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही सुरुवातीच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या धारधाव वेगवान गोलंदाजीचा यशस्वी सामना केला. 41 धावांवर टीम इंडियाला पहिला धक्का बसला, रोहित शर्मा 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन या जोडीने 90 धावांची भागिदारी केली. या दरम्यान शिखर धवनने आपले अर्धशकत पूर्ण केले, तर दुसरीकडे अर्धशतकाकडे वाटचाल करणारा विराट 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रायडूसोबत मिळून धवनने विजयावर शिक्कामोर्तब केले. धवन 75 तर रायडू 13 धावांवर नाबाद राहिला.
कोहलीची ‘विराट’ मजल, लाराचा विक्रम मोडत टॉप 10 फलंदाजांमध्ये एन्ट्री
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव 157 धावांमध्ये आटोपला. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 64 धावा कर्णधार केन विलिम्सन याने केल्या. न्यूझीलंडच्या 9 फलंदाजांना 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. हिंदुस्थानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने धारधार गोलंदाजी करत महत्त्वाचे तीन बळी टिपले, तर कुलदीप यादव याने तळाच्या फलंदाजांना फिरकीत अडकवत बळींचा चौकार लगावला. युजवेंद्र चहलने 2 तर केदार जाधवने 1 बळी घेतला.
Cricket News: प्रखर सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवला, क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ घटना
विजयानंतर बोलताना विराटने संघाचे कौतुक करत हा आमचा समतोल संघ असल्याचे म्हटले. तसेच आम्हाला यजमान संघ 300 धावांचे टार्गेट देईल असे वाटले होते, परंतु गोलंदाजांना कमाल करत त्यांना झटपट गुंडाळले. यावेळी विराटने शमीचेही कौतुक केले.



























































