आयसीसीकडून अंबाती रायडूचे निलंबन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेटर अंबाती रायडूला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने ही माहिती दिली आहे. अंबाती रायडूने केलेली गोलंदाजी संदिग्ध होती. याबाबत 14 दिवसांत रायडूला आपल्या गोलंदाजीची चाचणी देणे गरजेचे होती, ती चाचणी देण्यात रायडू अपयशी ठरल्याने आयसीसीने ही कारवाई केली आहे.

आयसीसीच्या नियमांनुसार जेव्हा एखादा क्रिकेटर गोलंदाजीत संशसास्पद आढळला जातो तेव्हा त्याला 14 दिवसांच्या आत आपली गोलंदाजीची चाचणी दिली जाते. या नियमानुसारच रायडूचे निलंबन करण्यात आले आहे. जोपर्यंत रायडू ही चाचणी देत नाही तोपर्यंत तो निलंबीत राहणार आहे. अंबाती रायडूचे फक्त गोलंदाजीतून निलंबन केले असून रायडू फलंदाजी करू शकतो.