
जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओने (IPO) इतिहास घडवला आहे. या आयपीसाठी १ कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. एवढा जास्त प्रतिसाद मिळणारा हा पहिला आयपीओ ठरला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बोली लावण्याची संधी असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे.
गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व सहभाग एक नवा जागतिक मानदंड हा आयपीओ प्रस्थापित करत आहे. हा धीरुभाई अंबानी यांचा वारसा आहे. तसेच लाखो भारतीय गुंतवणूकदारांना सक्षम करण्याच्या मुकेश अंबानी यांच्या दूरदृष्टीला पुढे नेणारे पाऊल आहे. त्यामुळे हा आयपीओ रिलायन्स उद्योग समुहासाठी महत्त्वाचा आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी १ कोटींहून अधिक अर्ज आले आहेत, तर इश्यू बंद होण्यासाठी अजूनही काही वेळ शिल्लक आहेत. ‘वारी एनर्जीज’ (Waaree Energies) च्या नावावर असलेला सुमारे ९७ लाख अर्जांचा मागील जागतिक विक्रम मागे टाकला आहे. यापूर्वी ‘बजाज हाऊसिंग फायनान्स’ (Bajaj Housing Finance) आणि ‘बीसीसीएल’ (BCCL) सारख्या कंपन्यांनी सुमारे ९० लाख अर्ज मिळवून विक्रम प्रस्थापित केले होते.
जागतिक स्तरावर १ कोटी अर्जांचा टप्पा ओलांडणारा हा पहिलाच आयपीओ ठरला आहे, जो जिओ प्लॅटफॉर्म्समधील गुंतवणूकदारांचा प्रबळ विश्वास दर्शवतो. बोली लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, अर्जांची अंतिम संख्या एक नवा, उच्च जागतिक मानदंड प्रस्थापित करू शकते. त्यामुळे आता या आयपीओकडे लिस्टिंगकडे सगळ्यांचे लक्ष आहे.





























































