Latur News – हडोळतीत बैल जोडी चोरीला, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
लातूरमध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आपल्या पशुधनाची जमेल त्या पद्धतीने शेतकरी काळजी घेत आहेत. मात्र, दुसरकीडे पशुधनच चोरून नेत असल्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी संग्राम नात गादेवार यांच्या आखाड्यातून बांधलेले बैल अज्ञान चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी बैल चोरीच्या तीन ते चार घटना घडल्याने पशूधनाच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हडोळती-हिप्पळगाव रस्त्या लगत संग्राम नाथ गादेवार यांचा आखाडा आहे, या ठीकाणी बांधलेले बैल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. चोरीस गेलेल्या बैलांमध्ये मोठ्या बांध्याचा काळ्या रंगाचा बैल तर एक पांढऱ्या रंगाचा बैलाचा समावेश आहे. पशुधनच्या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना परिसरात घडत असल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासकाने यांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे .
शेतकऱ्यासाठी ही बैलजोडी त्याची रोजी रोटी असून शेतीचा कामाचा आधार आहे. मोठ्या कष्टाने जीवापाड सांभाळलेल्या बैलाची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष घालने गरजेचे आहे. हडोळती येथील पशुधनासाठी उपाय योजना कराव्यात तसेच बैल चोरीला गेलेल्या या घटनेचा शोध घेऊन संबंधित चोरट्याचा छडा लावावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.