
ओडीशामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अंपायरला नो बॉल देणं जीवावर बेतले आहे. नो बॉल दिल्याने तरुणाने अंपायरला चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना ओडिशातील महिशिलांदा गावातील आहे, इथे क्रिकेट मॅच खेळली जात होती. ब्रम्हपुर आणि शंकरपूर शेकडो लोकांच्या उपस्थितीत ही मॅच सुरू होती. मात्र वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा अंपायरने ब्रम्हपूर टिम विरोधात चुकीचा निर्णय दिला आहे. अंपायरच्या याच निर्णयामुळे गावातील स्मृती रंजन राऊत नावाचा एक युवक नाराज झाला आहे आणि तो अंपायरशी वाद घालू लागला. हळूहळू त्यांच्यातील वाद वाढला. दरम्यान स्मृती रंजनने मैदानात चाकू काढून अंपायरच्या एकानंतर एक चाकू भोसकला. चाकूच्या वारने अंपायर जबर जखमी झाला. त्याला तत्काळ एनसीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.
डॉक्टरांनी अंपायरला मृत घोषित केले आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी सांगितले की, गावात सुरक्षा दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.



























































