
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दै. ‘सामना’च्या संपादिका सौ. रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट करणे भाजपला चांगलेच भोवले. याबाबतची तक्रार दाखल होताच भाजपचा महाराष्ट्र सोशल मीडिया सेल प्रभारी जितेन गजारिया याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल पाच तास त्याची कसून चौकशी केल्यानंतर कठणीकर आलेल्या गजारिया याने या ट्विट प्रकरणी बिनशर्त लेखी माफी मागितली.
भाजपचा सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया याने याआधी उपमुख्यमंत्री अजित पकार यांच्याविषयीही आक्षेपार्ह ट्विट केले होते. रश्मी ठाकरे यांच्याविषयीच्या ट्विट बाबत माहिती मिळताच सायबर पोलिसांनी जितेन गजारिया याला नोटीस पाठवली. दुपारी दोन काजता जितेन बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात आला. येताना सोबत वकीलही घेऊन आला होता. पाच तास झालेल्या चौकशीनंतर कठणीकर आलेल्या गजारियाने या ट्विट बद्दल बिनशर्त लेखी माफी लिहून दिली.
पुण्यात गुन्हा दाखल
जितेन गजरिया याच्याविरुद्ध पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना उपशहर संघटक उमेश वाघ यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया
सौ. रश्मी ठाकरे यांच्याबाबत करण्यात आलेल्या ट्विट बाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजपच्या एका प्रतिनिधीकडून करण्यात आलेल्या या कृत्याची भाजपच्या महिला आघाडीकडून पाठराखण करण्यात येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना हे मान्य असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणारे संस्कार हे अशा प्रकारचेच आहेत हे समजायचे का, असा सकाल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही हे कृत्य गंभीर आहे. ही बाब स्त्रियांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारी आहे. अशा विकृतीची गय केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सायबर कायद्यांतर्गत गजारिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी केली.
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यावर धडक
जितेन गजारिया यांच्याकिरोधात तत्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिकसेनेच्या महिला आघाडीने मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात धडक देऊन करिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार दिली. याकेळी पालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत, उपनेत्या मीना कांबळी, नगरसेकिका श्रद्धा जाधव, तृष्णा विश्वासराव, सुजाता सानप, अरुंधती दुधवडकर आदी उपस्थित होते.



























































