कोल्हापुरात शासकीय बैठक घेणारे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

449

स्वॅब तपासणीसाठी दिल्यानंतर क्वॉरंटाईन न होताच शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणारे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारीच आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघड झाला आहे.त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला आहे.

राधानगरी तालुक्यात कोरोना नियंत्रणासाठी दोन-तीन महिन्यांपासून संबंधित अधिकारी कार्यरत आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.अनेक शासकीय कार्यालयातही खबरदारी घेण्यात येत आहे. स्वॅब तपासणीला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला क्वॉरंटाईन व्हावे लागते. मात्र, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने या नियमाला हरताळ फासला आहे. स्वॅब तपासणी स देऊन क्वॉरंटाईन होण्याऐवजी त्या अधिकऱ्यांनी राधानगरीत परिस्थिती तपासण्यासाठी विशेष बैठक घेतली. त्यानंतर काही वेळातच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या बैठकीला तहसीलदार, सहाय्यक अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व तलाठी व कर्मचारी उपस्थित होते. त्या सर्वांची चिंता वाढली आहे. सुरक्षेसाठी या बैठकीला उपस्थित असलेल्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या