शिवराज सिंग चौहांनांना दिले थंड जेवण, अधिकारी निलंबीत

शिवराज सिंह चौहान यांना इंदूर दौऱ्या दरम्यान थंड जेवण दिले म्हणून एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. मात्र या घटनेवरून शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर या अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्यात आले. मनीष स्वाामी असे त्या अधिकाऱ्याचे नाव असून ते गेल्या दहा वर्षांपासून इंदूरच्या अन्न पदार्थ विभागात अधिकारी आहेत.

इंदूर विधानसभा क्षेत्रातील 50 कोटींच्या विकामसकामाच्या भुमीपुजनासाठी शिवराज सिंह चौहान हे इंदूरला आले होते. बुरहानपूरहून ते नेपानगर असा दौरा करून ते सहा वाजता इंदूरला येणार होते मात्र इंदूरला पोहचायला त्यांना आठ वाजले. त्यावेळी त्यांच्यासाठी ताजं जेवण बनवण्यात आले होते. मात्र मुसळधार पाऊस असल्याने त्यांना भोपाळचा परतीचा प्रवास हेलिकॉप्टऐवजी गाडीने करावा लागणार होता. त्यामुळे त्यांनी जेवण पॅक करून सोबत द्या, गाडीत खाईन असे सांगितले. त्यानुसार मनीष स्वामी यांनी गरम जेवण पॅक करून त्यांना दिले. मात्र मुसळधार पावसामुळे निर्माण झालेला थंडावा व गाडीतला एसी यामुळे ते जेवण थंड झाले व चपात्या चिवट झाल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मनीष सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मनीष सिंह यांनी मनीष स्वामी यांना निलंबित केले.

या प्रकरणी काँग्रेसने भाजप व मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर टीका केली. ‘ मुख्यमंत्री सांगतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण तुमच्या राज्यात कित्येक लोकं भुकेल्या पोटी झोपतात. तुमच्या काळात एका अधिकाऱ्याला तुम्हाला थंड जेवण दिले म्हणून निलंबीत केले जाते हे लज्जास्पद आहे’, अशी टीका काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी केली आहे. एकंदरीत या प्रकरणी टीका होत असल्याचे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याचे निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या