लग्नात भरपूर दागिने घातल्याने घात झाला, वाचा भयंकर बातमी

8588
फोटो- प्रातिनिधीक

कर्जात आकंठ बुडालेल्या एका गाडीचालकाला आणि त्याच्या बायकोला पोलिसांनी अटक केली आहे. वेंकटेश (वय-30 वर्षे) आणि अर्पिता (वय 21 वर्षे) अशी या नवरा बायकोची नावे आहेत. या दोघांनी मिळून दोन वयोवृद्ध जोडप्यांचा खून केला आहे. ज्यांचा त्यांना खून केला होता ते दोघेही घरात एकटेच राहात होते. त्यांना एकतर मूलबाळ नाहीये किंवा त्यांची मुले त्यांच्यासोबत राहात नाही. याची पूर्ण माहिती घेऊनच वेंकटेश आणि अर्पिताने या दोन्ही जोडप्यांना ठार मारले आहे.

वेंकटेश आणि अर्पिताचे तीन वर्षापूर्वी लग्न झालं असून त्यांना एक लहान मुलगी आहे. वेंकटेशने त्याची गाडी हा ओला,उबर सारख्या खासगी कार सेवा कंपनीशी जोडली होती. वेंकटेश आणि त्याची बायको अर्पिता हे टीव्हीवर लागणाऱ्या गुन्हेविषयक मालिकांचे कट्टर प्रेक्षक होते. या मालिका बघून आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे दोघांची माथी फिरली होती. या दोघांनी कोणाचा तरी खून करायचा आणि त्या व्यक्तीला लुटून कर्ज फेडायचं असा कट रचला होता. मात्र मारायचं कोणाला हे त्यांना कळत नव्हतं.

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील व्हाईटफील्ड पोलिसांच्या हद्दीमध्ये चंद्रेगौडा (वय -63 वर्षे) आणि लक्ष्माम्मा (वय -55 वर्षे) यांचा खून झाला होता. गरुडाचार्पाल्या भागातील RHB वसाहतीमध्ये या वृद्ध दांपत्याच्या खुनाची बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या दोघांचा खून 16 ऑक्टोबर रोजी झाला होता जो दुसऱ्या दिवशी उघडकीस आला. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास केला आणि त्यांना सीसीटीव्हीमुळे वेंकटेश आणि अर्पितापर्यंत पोहोचणं सोपं झालं. दोन्ही आरोपी हे मयतांचे लांबचे नातेवाईक होते. एका लग्नामध्ये ही दोन्ही जोडपी समोरासमोर आली होती लक्ष्माम्माच्या अंगावर असलेले दागिने पाहून वेंकटेशचे डोळे विस्फारले होते. तिथेच त्याने या दोघांना मारायचं ठरवलं होतं. वेंकटेश आणि अर्पिता जोडप्याला संशय येऊन नये म्हणून लग्नानंतर त्यांच्या घरी दोन-तीन वेळा जाऊन आले होते. 16 तारखेला ते अशाच पद्धतीने घरी गेले आणि अवजड वस्तूने डोक्यावर वार करून दोघांनी वृद्ध जोडप्याला ठार मारले.

वेंकटेश आणि अर्पिताने घरातील सोन्या चांदीचे सगळे दागिने गोळा केले आणि फरार झाले. या दोघांनी मल्लेश्वरम भागातील एका ज्वेलर्सकडे हे दागिने विकले आण 8.6 लाख रुपये मिळवले. त्यांनंतर त्यांनी एका मित्राच्या घरी आसरा घेतला, मात्र पोलीस त्यांच्या मागावर होते हे त्यांना माहिती नव्हतं. हे जोडपं निवांत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान वेंकटेश आणि अर्पिताने आपण आणखी एका जोडप्याचा खून केल्याचं कबूल केलं आहे. गुंडेगौडा आणि ललिताम्मा हे देखील खुनी जोडप्याचे नातेवाईकच होते नात्याचा फायदा घेत वेंकटेश आणि अर्पिता त्यांच्या घरात घुसले आणि त्यांना ठार मारून घरातला किंमती ऐवज चोरून फरार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या