बस प्रवासात ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी लांबवली

पुणे शहरात पीएमपीएल बसने प्रवास करीत असताना चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चेन चोरून नेली. ही घटना काल सकाळी साडेनऊच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते महानगरपालिका आणि चंदननगर प्रवासादरम्यान घडली.

याप्रकरणी 74 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिला काल सकाळी सव्वा नऊच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते चंदननगर असा बस प्रवास करीत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची चेन चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार शेवाळे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या