
गोव्यातून महाराष्ट्रात आलेल्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यातील कळणे, भिकेकोनाळ, कोलझर, शिरवल परिसरात नुकसान करत केर निडलवाडीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अचानक माघारी फिरत तो पुन्हा भिकेकोनाळमध्ये दाखल झाला आहे. आता तो सावंतवाडीच्या दिशेने जाणार की गोव्याकडे, याबाबत संभ्रम कायम असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ओंकार पुन्हा माघारी वळल्याने दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.























































