केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क करात कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरांनी सामान्य नागरिकांच्या नाकिनाऊ आणले आहेत. मुंबईत तर पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही शंभरी पार केली आहे. सामान्यांकडून पेट्रोल व डिझेलचे दर कमी व्हावेत अशी मागणी होत असताना केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क करात कपात केली आहे.

दिवाळीच्या मुहुर्तावर केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कर पाच रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्क दहा रुपयांनी कमी केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानुसार सुधारित दर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच गुरुवारपासून लागू होणार आहेत.