
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आणि स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रतीक ठरलेल्या ‘वंदे मातरम’ या गीतास 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले. संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीत म्हणण्याची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगानाने आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली.



























































