मुंबईतील सहकारी संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचा निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांमधील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना उभारी मिळावी यासाठी मुंबईतील सहकार संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी दीड कोटीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व मुंबई जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सुपूर्द करण्यात आला.

सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मुबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक संदीप घनदाट, पॅप्टन अभिजित अडसूळ, शिवाजीराव नलावडे, विठ्ठल भोसले, भिकाजी पारले, अभिषेक घोसाळकर, सुनील राऊत, आनंदराव गोळे, सिद्धार्थ कांबळे, अनिल गजरे, जयश्री पांचाळ, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, सोनदेव पाटील, विनोद बोरसे, नितीन बनकर, संजय कदम, संचालिका कविता देशमुख, शिल्पा सरपोतदार, कार्यकारी संचालक डी. एस. कदम, उपसहव्यवस्थापक संदीप सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.