साईमंदिरात दीड कोटीची चिल्लर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या दानपेटीत जमा झालेली नाणी स्वीकारण्यास बॅंकांनी नकार दिला आहे. ही चिल्लर तब्बल दीड कोटी रुपयांची आहे. इतके पैसे ठेवण्यास बॅंकेत जागा नसल्याचे कारण बॅंकानी दिले आहे. रिझर्व्ह बॅंकेने आता यावर तोडगा काढावा, अशी मागणी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे सीईओ दीपक मुंगळीकर यांनी केली आहे.