
पाण्याच्या बाटलीआड हेरॉईन तस्करीचा महसूल गुप्त वार्ता संचलनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. डीआरआय ने कारवाई करून 497 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. त्याची किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे.
दक्षिण आफ्रिका येथून एक मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय पुरिअर कंपनीच्या हबमध्ये पार्सल येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानंतर रविवारी डीआरआयचे पथक एका कुरिअर कंपनीच्या हबमध्ये गेले. तेथून एक पार्सल जप्त केले. त्या पार्सलमध्ये पाण्याच्या बाटल्या संशयास्पद वाटल्याने त्याची तपासणी केली. त्या बाटलीत 487 ग्रॅम हेरॉईन लपवले होते. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत 1. 5 कोटी रुपये इतकी आहे.
मुलुंड येथून एक कोटीचे चरस जप्त
एनसीबीच्या मुंबई युनिटने मुलुंड येथे कारवाई करून एक कोटी रुपये किमतीचे चरस जप्त केले. या प्रकरणी अश्रफ शहाला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलुंड परिसरात एक जण चरस घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मिळाली. त्यानंतर सोमवारी सापळा रचून अश्रफला ताब्यात घेतले.





























































