चीनमध्ये कोरोनाचा थैमान; दीड हजार जणांचा मृत्यू, जपानमध्ये पहिला बळी

825
प्रातिनिधीक फोटो

चीनमध्ये कोरोना व्हायरसने चांगलेच थैमान घातले आहे. हा व्हारयस चीनमधून इतर देशातही पसरला आहे. जपानमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे.

जपानमध्ये 80 वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरसचा मृत्यू झाला आहे. जपान सरकारने या माहितीला दुजोरा दिला आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हाँग काँग आणि फिलीपाईनमध्येही कोरोना व्हायरसमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे जपानच्या योकोहामा बेटाजवळील डायमंड प्रिंसेस क्रूजवर कोरोनाचे 28 नवीन रुग्ण आढळले आहेत. क्रूजमध्ये आतापर्यंत 218 रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यापासून या क्रूजमध्ये 3 हजार 711 प्रवासी अडकले आहेत. या क्रूजमध्ये सर्वप्रथाम एक रुग्ण आढळला होता. या क्रूजमध्ये 138 हिंदुस्थानी आहेत. त्यापैकी दोन हिंदुस्थानीना कोरोनाची लागण झाली आहे. हिंदुस्थानी दुतावास जपान सरकारच्या संपर्कात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या